आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

देवसू पलिकडची वाडी येथील दोन्ही साकव नादुरुस्त……….राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे मुळे ग्रामस्थांच्या समस्येत अधिकच वाढ

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🌄,देवसू दि२ऑक्टो- :-

देवसू पलीकडचीवाडी येथील दोन्ही साकव नादुरुस्त झाल्याने शाळकरी मुलांचे व नागरिकांचे मुख्य गावाशी संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली असून मुख्य गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पलीकडची वाडी येथे जाण्यासाठी एक लोखंडी साकव व एक सिमेंट साकव आहे मात्र पंचविस वर्षापुर्वीचा लोखंडी साकव लोखंडी पटट्या गंजल्याने धोकादायक झाला आहे. दहा वर्षापूर्वी नवीन कॉंक्रिटचा साकव उभारण्यात आला होता. तीन वर्षापुर्वी आलेल्या पुरात त्याच्या एका बाजूचा रॅम्प तुटून गेल्याने ग्रामस्थांनी लाकडी मचाण तयार करून तात्पुरती सोय केली आहे.तर यावर्षी दुसऱ्या बाजूचा रॅम्प कोसळला.त्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत अजूनच भर पडली. या ठिकणी बाजूला असलेल्या छोट्या ओढ्यावर सुद्धा छोट्या पुलाची आवश्यकता असून शाळकरी मुलांचे पालक या ओढ्यावर तात्पुरता लाकडी फळ्या टाकून साकव तयार करतात मात्र या वर्षीच्या पुरात तोदेखील वाहून गेला आहे. प्रशासकीय व राजकीय अनास्थेमुळे या साकवांच्या दुरुस्तीसाठी कुठल्याही उपाययोजना झाल्या नाहीत शाळा सुरू झाल्यानंतर या वाडीतील मुलांचा या धोकादायक रॅम्पवरून प्रवास सुरू होणार आहे. या ठिकाणी त्वरित उपाययोजना न झाल्यास विद्यार्थ्यांना सुमारे तीन ते चार किलोमिटर पायपीट करावी लागणार असून एसटी प्रवासासाठी सूद्धा या वाडीतील नागरिकांना सुमारे एक किलोमीटर अंतरावर देवसू शाळा किंवा देवसू कुंभेश्वरवाडी येथे पायपीट करावी लागते मात्र स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेमुळे या ठिकाणी दहा वर्षापूर्वी ग्रामपंचायतच्या दप्तरी रस्त्याची नोंद असून सुद्धा साधे मातीकाम सुद्धा न केल्यामुळे रस्त्यावर चर पडून चालणे सुद्धा कठीण झालेले आहे सुमारे 40 घरांची वस्ती असलेल्या या वाडीवर शाळकरी व कॉलेजची मुले एक किलोमीटर अक्षरशः जंगलातून प्रवास करतात हा रस्ता नसल्यामुळे त्या ठिकाणी पथदीपांची सुद्धा कुठलीही सुविधा ग्रामपंचायतीने केलेली नाही आणि त्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या वाडीतील ग्रामस्थ समस्यांच्या गर्तेत पुरते वेढले गेले आहेत.

 

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!