राज्य मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थित कोकीसरे गावातील कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश…
वैभववाडी प्रतिनिधी
कोकिसरे येथील अनेक कार्यकर्त्यानी राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत ओरोस सिंधुदुर्ग येथे नुकतेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.राजमंत्री सतीश उर्फ बंटी पाटील नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गावातील अनेक कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला भविष्यात काँग्रेस पक्ष न्याय देऊ शकतो या भावनेने काँगेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विकास सावंत, जिल्हा निरीक्षक गुलाबराव घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण ,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे ,जिल्हा युवक निरीक्षक शंभूराजे देसाई ,सिद्धेश परब, जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अरविंद मोंडकर,जिल्हा कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या समवेत वैभववाडी युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव यांच्या प्रयत्नातून व काँग्रेस नेते आनंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकिसरे गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी काँगेस पक्षात प्रवेश केला आहे. गौरेश पालकर,संतोष पालकर ,संतोष वळंजू, रंजीत पाटेकर ,दशरथ पालकर,हेमंत चव्हाण, अनिल पाटेकर ,दत्ताराम चव्हाण, विनायक चव्हाण, संकेत वळंजू यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.यावेळी कोकिसरे गावातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटेकर ,शशिकांत वळंजू, मंगेश उर्फ बाळा वळंजू उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे असे आश्वासन मंत्री राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले. फोटो :राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थित काँगेस पक्षात प्रवेश करतांना कोकीसरे गावातील कार्यकर्ते.