🛑 बोडदे गावचा सुपुत्र आकाश पारधी याच्या गोव्यात मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक..
🛑 गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला गौरव..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२८ :- जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून युरोलॉजी आणि लापारोस्कोपी रुग्णालय पर्वरी गोवा यांनी आयोजित केलेल्या १० किमी मॅरेथॉन स्पर्धेत दोडामार्ग तालुक्यातील बोडदे गावातील आकाश महेश पारधी या बोडदे गावच्या सुपुत्राने १० किमी मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन केला.
गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आकाश पारधी यांचा तृतीय क्रमांक संपादन केल्याबद्दल गौरव केला तसेच १०,००० रु. बक्षीस, मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन त्याला गौरवण्यात आले.आकाश महेश पारधी यांचा तृतीय क्रमांक आल्याने सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

