आमदार केसरकर यांच्या जम्प नेटवर्क ची जम्पच लय भारी जनतेच्या नजरेतून गेले दूरवरी
_*🛑आमदार केसरकर यांच्या जम्प नेटवर्क ची जम्पच लय भारी जनतेच्या नजरेतून गेले दूरवरी*_
*🛑बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीत पुरवणार धनीकांच्या मुलांचे चोचले*
*🛑गरीबांच्या मुलांकडे विव्दता असली तरी घरीच बसा,पैसा नाही तर शिक्षण नाही*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ संपादकीय : सीताराम गावडे*
सावंतवाडी येथे अलिकडेच स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रात चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असुन पैसे भरा व भरपूर शिका, गरिबांच्या मुलांनी दारुच्या गुत्यावर किंवा हाॅटेलात काम करा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जम्प नेटवर्क ने जी जम्प मारली त्यानंतर नेटवर्क आलेच नाही, तर सेट टॉप बॉक्स उघडलाच नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन,आंधळं दळतय आणि कुत्र पीठ घातय अशी अवस्था या योजनेची आहे.
शासनाने तर गरिबांच्या मुलांनी शिकायलाच नाही पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करुन ठेवली आहे , म्हणून खासगी ठेकेदार आपली पोटे भरण्यासाठी शासकीय जागांचा अल्पमोबदल्यात वापर करून विविध कोर्सच्या नावाखाली जनतेला लुटण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
ज्या उदात्त हेतूने बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी निर्माण करण्यात आली त्या हेतूलाच हरताळ फासला गेला असल्याचे आज प्रसिद्ध झालेल्या बातमी वरुन दिसून आले, मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात विविध प्रकारचे कोर्स उपलब्ध अशी आशयाची बातमी होती,आम्हाला वाटले आता गरीब विद्यार्थी शिकेल,पण कुठले काय?सहा महिन्यांचा कोर्स सात हजार रुपये व वर्षाचा पंचवीस हजार,सवलत काही नाही,ते म्हणतात गोव्या, मुंबईत या कोर्स ची फी कीती आहे ते बघा, मी म्हटले अरे बाबा. आमची मूले गोवा, मुंबई,पूणे सारख्या शहरात पाठवायची आमची ऐंपत असती तर तुमच्या तोंडाकडे का पाहिले असते का?याचाच अर्थ या उपक्रेंदाच्या माध्यमातून असे विविध कोर्सेस राबवून भविष्यात आपली पोटे भरण्याचे उद्योग सुरु झाल्याचेही दिसून येत आहे.
मागच्या वेळी आम्ही याबाबत सडेतोड लिहीले, अगदी मुंबई पासून आमदार दीपक केसरकर यांनी सुध्दा फोन केला,की वस्तुस्थिती वेगळी आहे म्हणून सांगायला, मात्र आमच्या बुध्दीला जे पटत नाही ते आम्ही कदापी स्विकारणार नाही मग शेंडी तुटो अथवा प्रारंबी,
शैक्षणिक दालन खुले याचा अर्थ असा नाही शिक्षणाचा बाजार मांडवा.. त्या बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीत आमच्या गरिबी विद्यार्थ्याला शिकायला मिळत नसेल तर असली ज्ञान प्रबोधिनी काय कामाची,जर धनीकांचीच मुले शिकत असतील तर नगरपरिषदेने या जम्प नेटवर्क व मुंबई उपकेंद्राला कोणत्या अटी “शर्ती घालून कोट्यावधीची इमारत वापारायला दिली याची माहिती घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे,
आम्ही कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या बाजूने किंवा विरोधात नाही,पण शासकीय जागेचा आधार घेत कोणी सामान्य जनतेला लुटायचे काम ,कोण कोणाच्या पदरा आडून करत असेल तर त्याला आम्ही चार चौघात उघडा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे ही या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करीत आहोत.
एखाद्या शैक्षणिक संस्थेचा माझ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील, गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा होत नसेल तर असली लुटारु दालने काय कामाची,असे आमचे मत आहे.गोर,गरीब विद्यार्थ्यांनी ही असे सहा महिन्यांचे एक वर्षाचे कोर्स करुन त्याचा काही फायदा होणार का?याची माहिती त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती कडून करुन घ्यावी नंतरच अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा असे आवाहन या निमित्ताने मी आपल्याला करीत आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

