कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 एलसीबीच्या सिंधुदुर्ग पथकाची कारवाई ; कारसह २४ हजाराचा मुद्देमाल जप्त..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि-२४ :- बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने तेर्से-बांबर्डे येथील एकाला ताब्यात घेतले आहे. साईनाथ उर्फ रोशन तात्या पवार (वय ३५) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २४ हजार रुपये किमतीच्या दारूसह साडे तीन लाखांची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास कोंडुरा तिठा परिसरात करण्यात आली. याबाबतची माहिती अशी की, संबंधित संशयित पवार हा दारू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडुरा येथे सापळा रचण्यात आला होता. यावेळी पवार हा दारू वाहतूक करताना आढळून आला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार सुधीर सावंत, प्रवीण वालावलकर, आशिष गंगावणे, अनिल धुरी, चंद्रहास नार्वेकर यांच्या पथकाने केली आहे.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!