🛑 चिपळूणमधील शाळांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी मिळावा प्रशांत यादव यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२३ :- महापुरामुळे नुकसान झालेल्या चिपळूण शहर आणि परिसरातील शाळांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली.
श्री. यादव यांनी मा. गायकवाड यांची मुंबईत भेट घेऊन यासंदर्भात मागणीचे निवेदन दिले. यावर लवकरात लवकर कार्यवाही होईल, असे आश्वासन यावेळी गायकवाड यांनी दिले. त्यांना दिलेल्या निवेदनात श्री. यादव यांनी म्हटले आहे, की चिपळूण शहर आणि तालुका परिसरात 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुरात प्रचंड वित्तहानी झाली. या महापुरामुळे अनेक घरे आणि दुकाने उध्वस्थ झालीच त्याशिवाय अनेक शाळांच्या इमारतींचेही प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. अनेक शाळा पूर्णपणे मोडकळीस आल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मात्र कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
पुरामुळे शहर आणि तालुक्यातील अनेक शाळांची हानी झाल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांना बसण्यास लायक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे या शाळांची दुरुस्तीचे काम आणि काही शाळांच्या पुनर्बांधणीचे काम तत्काळ हाती घेणे आवश्यक आहे. यासाठी निधीची आवश्यकता आहे. आमच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून आपल्या माध्यमातून हा निधी मंजूर व्हावा आणि प्रश्न तातडीने निकाली निघावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, चिपळुणातील महाराष्ट्र हायस्कूलचेही पुरात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी निधी मिळावा, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष रऊफ वांगडे, उपाध्यक्ष करामत मिठागरी आणि सर्व संचालकानी गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. हे निवेदनही यावेळी प्रशांत यादव यांच्या माध्यमातून गायकवाड यांना देण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कातकर, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गुलजार कुरवले, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले आदी उपस्थित होते.

