शासनाच्या इ पीक पाहणी व नोंदणी अभियानाची आंबोली मंडळात प्रभावी अंमलबजावणी……..तहसिलदार राजाराम म्हात्रे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर भेट
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴दाणोली, दि-२२सप्टेंबर :-
आंबोली मंडळात महसूल विभागात मार्फत गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देवून पीक पाहणी नोंदणी करण्यात आली. ई पीक पाहणी व नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर कशाप्रकारे उपाय योजना करण्यात येतील याचे प्रात्यक्षिक देण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत कोणतीही नवीन योजना आली तरी त्याची सर्वात यशस्वी रीतीने अंमलबजावणी आंबोली मंडळात केली जाते या मंडळाचे मंडळाधिकारी श्री जी.आर.गुरव व सर्व तलाठी व कर्मचारी जातीनिशी लक्ष देऊन या योजनांची अंमलबजावणी करतात. शासनाच्या ई-पिकपाहणी योजेनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची पिक पेऱ्यांची नोंद करावयाची आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये ई-पिकपाहणी अॅप डाउनलोड करून त्यावरून आपल्या शेतातील केलेल्या पिकांची जसे भात पीक , आंबा पीक, सुपारी पीक, नागली, माडबाग आणि बांधावरची झाडे या पिकांची ऑनलाईन नोंदणी करून ती आपल्या सातबारा सदरी नोंद करून घेण्याकरिता शासनाने सुविधा दिलेली असुन त्या सुविधेचा जास्तीस जास्त शेतकऱ्यांना प्रसिद्धी देवून त्यांचे मोबाईलवर रजिस्ट्रेशन करून ई –पिकपाहणी नोंदी करण्याबाबत गांव मौजे दाणोली सजातील दाणोली, देवसू. फणसवडे, केसरी, सातुळी, बावळाट या गावात मंडळ अधिकारी आंबोली श्री.जी.आर.गुरव, दाणोली तलाठी श्री.एस.एम.चितारे यांनी गावोगांवी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेवून त्यांना शासनाच्या ई-पीकपाहणी योजनेचे महत्व समजावुन सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद येत असून आजपर्यंत शेतकऱ्यांनी २१० आलेले असून संपूर्ण आंबोली मंडळातही त्याची प्रसिद्धी झालेने आजपर्यंत १२०० शेतकऱ्यांच्या पिकपाण्यांची नोंदणी झालेली आहे व शिल्लक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून शासनाच्या पिकपाहणी योजनेच्या फायदा करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.या वेळी ओवळीये पारपोली चे तलाठी कैलास गावडे सातुळी बावळाट सरपंच दिनानाथ कशाळीकर ,लक्ष्मण माळकर, कोतवाल काशिराम जाधव, पोलिस पाटील, रुपेश सावंत आदिनाथ सावंत, परशूराम लांबर व ग्रामस्थ उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

