कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग दशावतार चालक मालक संघटनेने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट..

 

🛑 नवरात्रोत्सवदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्याची करण्यात आली विनंती..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा, दि-२२ :- राष्ट्रवादी चे नेते एम के गावडे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग दशावतार चालक मालक संघटने ने मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा दादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.कोरोना काळात गेली दोन वर्षे सांस्कृतिक कार्यक्रम हे बंद होते .येणाऱ्या नवरात्रोत्सवदरम्यान कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी यावेळी उपमुख्यमंत्री यांना विनंती करण्यात आली.यावेळी कोरोना चे नियम पाळून येणाऱ्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करू असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी दिले.त्यामुळं येणाऱ्या काळात कलाकारांना हा एक मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार यांना आपल्या दशावताराचे कार्यक्रम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आज मुंबई येथे भेट घेतली यावेळी दशावतार चालक-मालक संघाचे पदाधिकारी अध्यक्ष सन्माननीय तुषार नाईक, उपाध्यक्ष नाथा नालंग सचिव सचिन पालव सहसचिव सुधीरजी कलिंगण खजिनदार देवेंद्र नाईक सदस्य सुवर्ण कुमार मोचेमाडकर अन्य सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!