🛑 गणेश उत्सवाच्या काळात महामार्ग पोलीस कसाल, कणकवली पोलीसांनी गोवा महाराष्ट्र सिमेवर सिमातपासणी नाक्यावर बजावला बंदोबस्त..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय भाईप
🎴सावंतवाडी, दि-२१ :- कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो.चाकरमणी गावी येत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वहातुक असते.गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अवजड वहातुक बंद ठेवण्यात येते.
आपण मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचा आनंद घेत असतो.मात्र पोलीसांच्या घरामध्येही गणेशोत्सव असताना पोलीस सेवा बजावत असतात.आपल्या घरात गणपती असताना त्यांना आपल्या कुंटुबाच्या आनंदात सहभागी होता येत नाही.
यावर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमणी आल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्याप्रमाणात वहातुक असताना पोलीसांनी अतीशय चांगल्या प्रकारे सेवा बजावली.कोकणामध्ये गणेशोत्सव बदोबस्तासाठी महाराष्ट्रातुन पोलीस येतात.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शेवटचे टोक बांदा असल्याने याठीकाणी अवजड वहाने थाबवण्यात येत असल्याने पोलीसांवर खुप भार असतो.
बांदा सिमातपासणी नाक्यावर कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने बंदोबस्ताला असलेल्या पोलीसाचे जेवणाचे हाल होतात.अशाही परिस्थीतीमध्ये जवळपास १५ दिवस महामार्ग पोलीस कसाल,कणकवलीचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रदिप पुजारी, सहाय्यक पोलिस फौजदार नाईक, पोलीस हवालदार विलास गवस, पोलीस नाईक अंकुश नाईक, पोलीस नाईक रुपेश नाईक, पोलीस नाईक राजु दळवी, पोलीस नाईक शांताराम परब यांनी अतीशय सुंदर सेवा बजावली.

