कोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

🛑 मुंबई गोवा हायवेवरील कोदवली पेट्रोल पंप येथे बिबट्याची कातडी पकडली..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

 ✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर,दि-२१:- काल दि. २० सप्टेंबर रोजी रात्री ९:३० च्या सुमारास मुंबई गोवा हायवेवरील कोदवली पेट्रोल पंप येथे दोन दुचाकी स्वारांची हालचाल संशयास्पद वाटल्याने परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी व स्टाफ यांनी त्या ठिकाणी जाऊन संशयित व्यक्तींकडील बॅगांची तपासणी केली. त्यात एका बॅगेमध्ये बिबट्या या वन्यप्राण्याची कातडी आढळून आली. वन्यप्राण्यांच्या तस्करी बाबत वनविभागाने तीनही आरोपींना बिबट्याच्या कातडी सह ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी व त्यांचा स्टाफ यांनी शिरोडा, ता. वेंगुर्ले येथील १) जयेश बाबी परब, २३ वर्षे, २) दर्शन दयानंद गडेकर २० वर्षे, आणि ३) दत्तप्रसाद राजेंद्र नाईक २२ वर्षे, सर्व रा. शिरोडा, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग या आरोपींना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ५१, ५२ नुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

आरोपींच्या ताब्यातील इतर मुद्देमाल दोन मोटारसायकली, तसेच ओप्पो, रेडमी, व्हिवो या कंपन्यांचे मोबाईल जप्त करून ताब्यात घेतले आहेत.

सदर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून पुढील तपास सुरू आहे. सर्व आरोपींना राजापूर येथील प्रथम वर्ग न्यायालय, राजापूर यांच्या समोर हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना २४ सप्टेंबर पर्यंत ४ दिवसांची वन कोठडी दिली आहे. सरकारच्या वतीने ऍड. ओमकार अनिल गांगण यांनी काम पाहिले.

सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी इत्यादींनी चोखपणे पार पाडली आहे.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!