गणेश विसर्जनाच्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्ते रविवारी वाहतुकीसाठी राहतील बंद…
🛑 रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून मानाच्या गणपतींचे विसर्जन होईपर्यंत रस्ते असतील बंद…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुर्यकांत जाधव
🎴पुणे : दि. १९ गणेश विसर्जनाच्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्ते रविवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून ते प्रमुख व मानाच्या गणपतींचे विसर्जन होईपर्यंत रस्ते बंद असतील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत पार पडला आहे. गणपतीचे रविवारी विसर्जन असल्याने पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारने दिलेल्या नियमांनुसार विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे विसर्जन जागेवरील हौदांत किंवा महापालिकेच्या फिरत्या हौदांत करावे लागणार आहे. मध्यवर्ती भागात मानाचे व प्रमुख गणेशोत्सव मंडळे असल्याने नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता : शिवाजीनगरहून स्वारगेटला जाणाऱ्यांसाठी शिवाजी रस्ता स. गो. बर्वे चौकातून वाहतुकीसाठी बंद असेल. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्तामार्गे स्वारगेट व इच्छितस्थळी जावे.
बाजीराव रस्ता : स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणाऱ्या वाहनचालकांसाठी बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पुरम चौक येथे बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी स्वारगेट, सारसबाग, पुरम चौक, टिळक रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रस्त्याने गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगरकडे जावे.
मध्यवर्ती भाग : शहराच्या उपनगरांमधून येणाऱ्या नागकांसाठी मध्यवर्ती भागात जाण्यासाठी महत्त्वाचे असणारे लक्ष्मी, केळकर, कुमठेकर या तिन्ही रस्त्यांवरील वाहतूक रविवारी बंद असेल. टिळक चौकातूनच तिन्ही रस्त्यांवर जाणारी वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
अंतर्गत रस्तेही बंद : नागरिकांची व वाहनांची रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात येणार आहे. याच पद्धतीने महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, बेलबाग चौक, शनिवारवाडा या ठिकाणी जाणारे अंतर्गत रस्तेही बॅरिकेड टाकून बंद केले जाणार आहेत.
गणेशोत्सव विसर्जनासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते रविवारी सकाळपासूनच बंद करण्यात येणार आहेत. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनीही मध्यवर्ती भागात न येता पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जावे – राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा.
सविस्तर वाचण्यासाठी 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
😍 *सुवर्णसंधी! सुवर्णसंधी…!*
🇮🇳 भारत सरकारचा उपक्रम *भारतीय आयुर्विमा महामंडळ* (LIC) मध्ये मेगा विमाप्रतिनिधी भरती *(पार्ट टाईम किंवा फुलटाईम).*
🎯 *योजनेचे लाभ* :- आकर्षक अमर्यादित कमिशन.
💰 (अनेक विमाप्रतिनिधींचे उत्पन्न पहिल्याच वर्षी : प्रतिमाह 25,000 ते 50,000 असते.)
💁♂ *अधिकचे फायदे* :-
● गृहकर्ज केवळ 5℅ दराने.
● कार, कॉम्पुटर, लॅपटॉप अॅडव्हान्स.
● देशात परदेशात विमान प्रवासाची संधी.
● ग्रॅच्युइटी (2 लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स.
● मोफत ट्रेनिंग व सेमिनार.
● दरमहा दोन वेळा कमीशन.
● दिवाळी फेस्टिवल अॅडव्हान्स.
● स्वतंत्र ऑफिस टाकण्यासाठी व मोबाइल बिल अलाउंस.
● आपल्यानंतर नॉमिनीला कमिशन सुविधा
● कुठलीही गुंतवणूक नाही.
● आपला व्यवसाय, नोकरी संभाळून उर्वरित वेळात हे काम तुम्ही करू शकता.
*⌛ मर्यादित जागा…⌛*
🎓 *शैक्षणिक योग्यता* :- कमीत – कमी 10वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी.
*👉संपर्क : संदीप रोहिदास कोल्हे (LIC विकास अधिकारी)*
*📲मोबाईल नंबर – 9975169495 / 9405075919*
*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचुक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

