🛑 साटेली- भेडशी शांतादुर्गा मंदिरा नजीक रस्त्यावर आडवे असलेले ‘ते ‘ झाड लवकरात लवकर बाजूला करावे ; वाहन चालकांची मागणी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१७ :- साटेली – भेडशी शांतादुर्गा मंदिरा नजीक परमे- घोटगे रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून एक झाड धोकादायक बनले आहे. ते झाड कधी पण पडण्याची शक्यता आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी सुरु असते. त्यामुळे कोणावरही हे झाड अचानक पडले तर अपघात होऊ शकतो . त्यामुळे हे झाड संबंधित विभागाने तात्काळ बाजुला करावे अशी मागणी वाहन चालकांमधून व पादचार्यांकडून केली जात आहे.

