कोकण

वाहतूक पोलिस सुमित पिरणकर यांचा प्रामाणिकपणा…..

*सावंतवाडी ता.१६-:*
भटवाडी येथील विनीता करमळकर या महिला तिन दिवसापूर्वी बाजार घेऊन घरी जात असताना त्यांची पर्स वाटेत रस्त्यावर पडली होती. त्यानंतर आज तिकडून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस सुमित पिरणकर हे जात असताना त्याना ती पर्स मिळाली. त्या पर्समध्ये लायसन्स होते. त्यानुसार त्यांनी त्या महिलेशी संपर्क साधून ती पर्स त्या महिलेला परत केली. त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्या महिलेने पोलीस सुमित पिरणकर यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी वाहतूक पोलीस प्रशांत आरोलकर, प्रविण सापळे, सुनील नाईक, सखाराम भोई आदी पोलीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!