श्री. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर सावंतवाडी नगरपरिषदेने ३ आधुनिक बोटी आणुन गणेश विसर्जनासाठी ठेवल्या सज्ज…
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि. १५
श्री. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगर परिषदेने तीन आधुनिक बोटी आणून गणेश विसर्जनासाठी सज्ज ठेवल्या होत्या, त्यामुळे यंदा दीड आणि पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मोती तलावाच्या खोल भागात करणे शक्य झाले. सावंतवाडी नगराध्यक्ष संजु परब यांच्या पुढाकाराने श्री. गणेश विसर्जन सुलभ व्हावे, असे नियोजन करण्यात आले होते.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सर्व गणेश भक्तांच्या आलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे करून भक्तांना दिलासा दिला. मोती तलावाच्या खोल भागात नेऊन गणेश विसर्जन करण्यासाठी श्रीराम वाचन मंदिर समोर, मॅंगो टु हॉटेलच्यासमोर आणि सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या समोर अशा तीन ठिकाणी बोटिंगची सुविधा करून गणेश विसर्जनची सोय करण्यात आली होती.
कोविडच्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी देखील घेण्यात आली. त्यामुळे सायंकाळपासून – रात्रीपर्यंत येणाऱ्या गणेश मूर्तींचे विसर्जन नियोजनबद्ध करून सर्व गणेशभक्तांना नगरपालिकेने दिलासा दिला.
यासाठी नगराध्यक्ष संजू परब आणि नगरसेवक यांचे सहकार्य लाभले. तसेच नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे दीपक म्हापसेकर यांनी टिमवर्कने तसा प्रयत्न केला.
सविस्तर वाचण्यासाठी… 👇👇👇👇👇👇👇👇
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*