आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली बस स्टँड येथे तपासणी नाका सुरू करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध…….स्वच्छतागृहाची सोय करावी मगच तपासणी नाका सुरू करावा- वैभव राऊळ

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी, दि-५ऑगस्ट :-आंबोली एसटी स्टँड परिसरात तपासणी नाका करताना प्रशासनाने स्वच्छतागृहाची सोय करावी. एसटी बस स्टँड परिसरात स्वच्छतागृहाची कोणतीही सोय नसल्याने महिलांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. मात्र याचा कुठलेही सोयरसुतक प्रशासनाला किंवा संबधित लोकप्रतिनिधींनी नसून याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाचे काम कासवगतीने सुरू असून हे काम लवकर होण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासन कुठल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत नाही. आणि याच ठिकाणी प्रांताअधिकारी व तहसीलदार यांनी पाहणी करून कोव्हीड तपासणी नाका सुरू करण्याचा घाट घातला आहे. या ठिकाणी ही तपासणी नाके सुरू करताना ज्या प्रमाणात गाड्या थांबून गर्दी होणार आहे तसेच महिला वर्गांना स्वच्छतागृहाच्या अभावी अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तसेच भाजीपाल्याची दुकाने व मासे विक्रेते छोटे-मोठे व्यवसायिक याच परिसरात असल्याने स्थानिक ग्रामस्थांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते याचे कोणतेही नियोजन न करता प्रशासन आपली कारवाई करत आहे. मुळात पर्यटन विकासाच्या नावाखाली आंबोलीत जे स्वच्छतागृह बांधले आहे त्याला भलेमोठे टाळे लावून बंद ठेवण्यात आले. असून याठिकाणी पार्किंगसाठी वाहनतळ सुद्धा बनवलेला आहे. व सद्यस्थितीत या ठिकाणी तपासणी नाका आहे. या ठिकाणचे स्वच्छतागृह सुरू करण्याऐवजी बस स्टँड परिसरातच गैरसोयीच्या ठिकाणी तपासनी नाका सुरू करण्यास आंबोलीवासीयांचा तीव्र विरोध आहे. बंद असलेले स्वच्छतागृह का बंद आहेत? ते सुरू करण्यासाठी कुठल्या अडचणी आहेत हे न बघता लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या विभागांमध्ये नसलेली सुसूत्रता यामुळे आंबोलीवासियांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!