आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

शिवसेना पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख घेण्यासाठी किरीट सोमय्या पुढे आले – वैभव नाईक

🛑 किरीट सोमय्या यापुढे मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर असे बेछूट आरोप करत राहिले तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, वैभव नाईक यांचा इशारा…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. ०३ मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने परिवहन मंत्री अनिल परब यांना गुंतवण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलिंग करत आहेत. यापूर्वी खासदार नारायण राणे यांच्यावर केलेल्या ईडीचे (ED) चौकशीचे काय झाले? असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी विचारला आहे.

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर नाईक म्हणाले, शिवसेना पक्ष आणि नेत्यांवर तोंडसुख घेण्यासाठी किरीट सोमय्या पुढे आले आहेत. अनिल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. वडिलोपार्जित घर दुरुस्ती त्यांनी केली असून, सिंधुदुर्गात त्यांची या व्यतिरिक्त एकही मालमत्ता नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये अनिल परब यांची ताकत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना गुंतवण्यासाठी अनिल परब यांच्यावर बेछूट आरोप करण्याचा प्रकार आहे.

पुढे ते म्हणाले, कुडाळ येथील एस.टी. डेपोचे काम २ कोटीचे होते. इंजिनियर कंपनीने हे काम केले, ते कोणाच्या जवळचे आहेत हे सर्वश्रुत आहे. जर २ कोटीचे काम असेल तर, अडीच कोटीचा घोटाळा कसा झाला ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. नारायण राणे यांच्या 53 कोटीच्या बेनामी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केली. नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाले कुठून? यात कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी का थांबली ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. किरीट सोमय्या जर यापुढे मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर असे बेछूट आरोप करत राहिले तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही इशारा नाईक यांनी यावेळी दिला आहे.

========================================================================

😍 *सुवर्णसंधी! सुवर्णसंधी…!*
🇮🇳 भारत सरकारचा उपक्रम *भारतीय आयुर्विमा महामंडळ* (LIC) मध्ये मेगा विमाप्रतिनिधी भरती *(पार्ट टाईम किंवा फुलटाईम).*
🎯 *योजनेचे लाभ* :- आकर्षक अमर्यादित कमिशन.
💰 (अनेक विमाप्रतिनिधींचे उत्पन्न पहिल्याच वर्षी : प्रतिमाह 25,000 ते 50,000 असते.)
💁‍♂ *अधिकचे फायदे* :-
● गृहकर्ज केवळ 5℅ दराने.
● कार, कॉम्पुटर, लॅपटॉप अ‍ॅडव्हान्स.
● देशात परदेशात विमान प्रवासाची संधी.
● ग्रॅच्युइटी (2 लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स.
● मोफत ट्रेनिंग व सेमिनार.
● दरमहा दोन वेळा कमीशन.
● दिवाळी फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स.
● स्वतंत्र ऑफिस टाकण्यासाठी व मोबाइल बिल अलाउंस.
● आपल्यानंतर नॉमिनीला कमिशन सुविधा
● कुठलीही गुंतवणूक नाही.
● आपला व्यवसाय, नोकरी संभाळून उर्वरित वेळात हे काम तुम्ही करू शकता.
 *⌛ मर्यादित जागा…⌛*
🎓 *शैक्षणिक योग्यता* :- कमीत – कमी 10वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी.
*👉संपर्क : संदीप रोहिदास कोल्हे (LIC विकास अधिकारी)*
*📲मोबाईल नंबर – 9975169495 / 9405075919*
*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचुक बातमी थेट हल्ला*
============================================================================
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
===========================================================================
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
      _अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!