🛑 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अकार्यक्षम प्रशासन व राज्यकर्त्यांचा निषेधर्थ भाजपचे ” चलो वॉर्ड ऑफिस ” मोर्चा..
🛑 असंख्य भाजप कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई, दि-०२ :- भारतीय जनता पार्टी च्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका च्या पश्चिम वॉर्ड अंधेरी पश्चिम ला बृहन्मुंबई महानगरपालिका अकार्यक्षम प्रशासन व राज्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी पालिकेच्या कार्यालयावर ” चलो वॉर्ड ऑफिस “म्हणुन मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चा मध्ये त्यांनी चक्रीवादळ व अतिवृष्टी मुळे मुंबई कर नागरिकांना मदत मिळाली पाहिजे. कोरोना मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांना पाणीपट्टी, अग्निशमन कर, अंतर्गत रस्ते कर, सुधारणा कर, आदींमध्ये ५०% सवलत मिळाली पाहिजे. ह्या सर्व मागण्या केल्या. त्या मोर्चा ला अमित साटम, १६५ अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार, रोहन राठोड, नगरसेवक, सुधा सिंग, नगरसेवक, अनिष मकवानी, नगरसेवक, कॅप्टन राकेश कोएल्हो, एन जी ओ सेल, उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई, जिल्हा अध्यक्ष, तसेच सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

