🛑 कचरा ,स्ट्रीट लाईट आणि पाण्याच्या समस्यासाठी महिला व नागरिकांनी घेतली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांची भेट..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-०२ :- वैभववाडी शहरातील कचरा ,स्ट्रीट लाईट आणि पाण्याच्या समस्यासाठी वैभववाडीतील महिला व नागरिकांनी उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचला या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज कांबळे यांना गणपती पूर्वी सर्व विषय मार्ग लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने ह्या ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आज वैभववाडी तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी तहसीलदार रामदास झळके,तक्रारदार
माजी नगराध्यक्ष अक्षता जैतापकर, मीनाताई बोडके ,सुंदराबाई निकम, बंड्या होळकर ,अनंत तांबे उपस्थित होते.
कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वैभववाडी नगर पंचायत हद्दीतील बरेच दिवस ऐन पावसाळ्यातही पाण्याची समस्या कायम राहिली आहे कमी प्रमाणात पाणी पाणीपुरवठा होणे, पाणीच न येणे, पाण्यातून आळी येणे अशा समस्या अनेक दिवस सुरू आहेत याबाबत नगरपंचायतीच्या ही निदर्शनास आणून दिले असता त्याबाबत कोणताही ठोस कारवाई झालेली नसल्याचा नागरिकांनी सांगीतले . तसेच शहरातील बरेच ठिकाणच्या स्ट्रीट लाईट बंद स्थितीत आहेत त्यामुळे नागरिकांना रात्रीचे वेळी खूप गौरसोय होत आहे. शहरासाठी कचरा उचलण्यासाठी महिन्याला लाखो रुपयांचा निधी नगरपंचायत तिकडून खर्च केला जातो परंतु ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित कचरा व्यवस्थापन होत नसल्याची तक्रार ही यावेळी मांडण्यात आली तसेच जमा केलेला कचरा ही नगरपंचायतीने कचऱ्यासाठी घेतलेल्या जागेत न टाकता वस्तीमध्ये टाकला जात असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी गंभीर दखल घेत मुख्यकार्यकारी अधिकारी श्री कांबळे यांना याबाबत सक्त सूचना देऊन स्वतः लक्ष घालून कर्मचाऱ्यांकडून सर्व कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या उपविभागीय अधिकारी यांच्या
कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले .

