गुरे चरायला घेऊन गेलेल्या गृहिणीवर काळाचा आघात..
▪️कणकवलीतील कोंडये येथील दुर्दैवी घटना..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : तुषार नेरुरकर
🎴कणकवली,दि.१४: तालुक्यातील कोंडये येथील मयुरी मंगेश तेली (वय ४०) या विवाहित महिलेचा ओढ्यात मडयेचा व्हाळ येथे वाहून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल मुसळधार पाऊस सुरु असताना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने अक्षता तेली ही १४ वर्षाची मुलगी बचावली आहे. मृतदेह आज बुधवारी सकाळी आढळून आला. या घटनेमुळे कोंडये गावावर शोककळा पसरली.
याबाबत अधिक वृत्त असे की, कोंडये येथील मयुरी मंगेश तेली (वय ४०) या विवाहित महिलेचा ओढ्यात वाहून गेल्याची घटना काल १३ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता मडयेचा व्हाळ करंजे व कोंडये सीमेवर घडली. ही महिला आपल्या मुलीसमवेत नेहमीप्रमाणे गुरे राखण्यासाठी रानात गेली असताना पावसामुळे ओढ्यात तोल जाऊन वाहून गेली. सुदैवाने तिच्यासोबत असलेलेली अक्षता तेली १४ वर्षाची मुलगी होती. तिच्या हाताला झाडाची फांदी लागल्याने बचावली. तिने आरडाओरडा करत आई वाहून गेली असे शेजारी व घरी जाऊन सांगितले. तोपर्यंत ती वाहून गेली, तात्काळ ग्रामस्थांनी शोध मोहीम राबविली, पण रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवली. आज बुधवारी ग्रामस्थांनी सकाळीच शोध मोहीम हाती घेतली. त्यात तिचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, कणकवली तहसिलदार रमेश पवार यांनी घटनास्थळी सकाळी ७.३० वाजता भेट दिली. ग्रामस्थांनी सकाळी मृतदेह शोध मोहीम राबवली. त्यावेळी एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत साधारण दोन किलोमीटरच्या अंतरावर मयुरी तेली हिचा मृतदेह आढळून आला. यामुळे कोंडये गावात खळबळ उडाली. याप्रकरणी कणकवली पोलीस व महसूल विभाग कणकवली पोलीस उपनिरीक्षक श्री. बाबर,पोलीस हवालदार श्री. वंजारे, महसुल मंडळ अधिकारी निलिमा प्रभुदेसाई, तलाठी मारुती सलाम या पथकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तर फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत मयुरी तेली हिचे शवविच्छेदन डॉ.जंगम व आशा सेविका सिमरन तांबे यांनी केले.
घटनास्थळी मदतीसाठी पोलीस पाटील संदेश मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य उमेश मेस्त्री, सचिन परब, माजी तंटामुक्ती अध्यक्ष आनंद परब, रवींद्र तेली, दिलीप तेली, सिताराम आंबेरकर, दिलीप परब, किरण रेडकर, राजा डिचोवलकर, महेंद्र डिचोवलकर, संदीप रासम आदींनी धावून जात मदत कार्य केले.
या घटनेची खबर दिर संजय रेडकर-तेली यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. मयत मयुरी तेली हिच्या पश्चात पती, मुलगी, सासु, आई, दिर असा परिवार आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_