छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘अतिरेकी हिंदुत्वाचे प्रिय प्रतीक’ म्हणत घोर अवमान..
▪️‘द वायर’चे संपादक आणि मालक यांच्या विरोधात पोलीसांत तक्रार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्ग,दि.१४: ‘द वायर’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर दिनांक ८ ऑक्टोबर रोजीच्या ‘By Attacking the Mughals, Adityanath Is Erasing the History of His Own Nath Samprady’ या मथळ्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि क्रिस्टीन मारेवा कारवोस्की या पत्रकार महिलेने लिहिलेल्या एका लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘मुघल म्युझियम’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ असे करण्याची घोषणा केली, यावर टीका करणार्या या लेखात ‘छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे हिंदु राष्ट्रवादाच्या अतिरेकी हिंदुत्वाचे सर्वात आवडते प्रतिक’ असे म्हटले आहे. हे लिखाण अत्यंत निंदनीय असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करते. अवघ्या हिंदु समाजाला दैवतासमान असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान करणार्या ‘द वायर’ या न्यूज पोर्टलचे संपादक, मालक आणि पत्रकार यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.
श्री. शिंदे यांनी सांगितले की, या विरोधात मुंबईत विक्रोळी येथे श्री. प्रभाकर भोसले यांनी, तर अमरावती येथे श्री. रोशन मुळे यांनी, रायगड येथे श्री. रोहिदास शेडगे यांनी पोलीस तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीमध्ये ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन, सिद्धार्थ भाटीया, एम.के. वेणु आणि लेखिका क्रिस्टीन मारेवा कारवोस्की यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३ अ, २९५ अ आणि ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करावा आणि आरोपींना त्वरीत अटक करावी, असे म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणत्याही प्रकारे केला गेलेला अवमान हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी या प्रकरणी तात्काळ माफीनामा जाहीर करावा आणि हे वृत्त मागे घ्यावे, तसेच अखिल हिंदु समाजाची जाहीर माफी प्रसिद्ध करावी, अन्यथा या प्रकरणी आपल्याला न्यायालयामध्ये खेचू, अशी चेतावनीही श्री. शिंदे यांनी या वेळी दिली.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

