🛑 मालवण हिवाळे कसाल रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा..
🛑 वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांची मागणी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०१ :- मालवण तालुक्यातील मालवण हिवाळे ओसरगाव कसाल या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना रस्त्यावर वाहने चालविताना कसरत करावी लागत असून यामध्ये रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे कोकणातील गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुणे मुंबई येथून चाकरमानी गणेश चतुर्थी सणासाठी मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे मालवण हिवाळे कसाल रस्त्यावर खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

