🛑 कुडाळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोबाईल आंदोलन..
🛑 २५३ मोबाईल केले शासनाकडे जमा..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२१ :- पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट व सदोष असल्याचा आरोप करत अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मोबाईल वापसी आंदोलन छेडले मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली यामुळे आंदोलन छेडत कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील 281 मोबाईल पैकी 253 मोबाईल येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त करीत शासन दरबारी जमा केले .
राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यभर या आंदोलन सुरू आहे सिंधुदुर्गातही आंदोलनाला शुक्रवारी कुडाळ येथे सुरुवात झाली मात्र कोरोनामुळे पोलिसांनी मोर्च्याला परवानगी नाकारली यामुळे शिष्टमंडळाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात जात तालुक्यातील 253 मोबाईल शासनाकडे परत जमा करण्यासाठी प्रकल्प अधिकारी मोहन भोई यांच्याकडे सुपूर्त केले त्यामुळे नादुरुस्त झाले सहा मोबाईल प्रकल्प कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहेत पंचनामा करून हे मोबाईल ताब्यात घेतले तसेच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून शांततेत आंदोलन यशस्वी झाल्याची माहिती कमलताई परुळेकर यांनी दिली . कविता शेळके शैलेजा कांबळे संयोगिता पालव लक्ष्मी परब चंद्रलेखा देसाई अनुजा सावंत विद्या मेस्त्री स्वप्नाली मेस्त्री आदी प्रमुख उपस्थित होते
शुक्रवारी सकाळी 11 वाजता कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अंगणवाडी सेविका भैरवाडी येथे जमा झाल्या मात्र कोरोनामुळे मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली मोर्चा काढू नये अशी विनंती पोलिसांनी प्रशासनाने कमलताई परुळेकर यांना केली त्यांनी ती मान्य करीत असे शांततेत आंदोलन छेडले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने दिलेले मोबाईल जमा करण्यात आले यानंतर आठ ते दहा जणांच्या शिष्टमंडळाने कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पंचायत समिती येथे पायी जात एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडे सर्व मोबाईल व नावांची यादी शासनाकडे पाठविण्यात साठी सुपूर्त केली प्रकल्प अधिकारी मोहन भोई यांनी मोबाईल जमा करू नका तुमच्या भावना शासनाकडे पोहोचवल्या जातील अशी विनंती केली मात्र परुळेकर यांनी आमचे आंदोलन राज्यस्तरीय आहे राज्यभरात सर्वजण मोबाईल शासनाकडे परत जमा करणार आहेत अशी भूमिका स्पष्ट करीत यांच्याकडे एकत्रित मोबाईल नावाची यादी व मागण्यांचे निवेदन सादर केले पोषण आहार कार्यक्रमांतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविकांना शासकीय मोबाईल वाटप करण्यात आले होत या मोबाईलची वॉरंटी दोन वर्षे असून प्रो कालावधी मे 2021 मध्ये संपला आहे सदर मोबाईल दोन जीबी रॅम चा आहे मोबाईल मध्ये लाभार्थ्यांची नावे हजेरी वजन उंची सनदा व गर्भवती मातांची माहिती पोषण आहाराचे वाटप सविस्तर माहिती भरण्यात येते मोबाईलची क्षमता रॅम कमी असल्यामुळे भरण्याची माहिती जास्त असल्यामुळे मोबाईल हँग होतात मोबाईल घेऊन ते सतत नादुरुस्त होतात यांच्या दुरुस्तीसाठी रुपये तीन हजार आठ हजार खर्च होतो अंगणवाडी सेविका न कडून वसूल केला जातो महाराष्ट्रात असे आज तीन हजारापेक्षा जास्त मोबाइल बंद पडले आहेत त्यामुळे राज्यभर अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मोबाईल वापस आंदोलन सुरू करण्यात आले आहे या मोबाईलची क्षमता कमी पडत असल्यामुळे केंद्र शासनाने पोषण ट्रॅक ॲप डाऊनलोड होत नाही यामुळेच अंगणवाडी सेविकांना वैयक्तिक मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करावे लागतात सदर इंग्रजी मध्ये असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्रीस्त्याच्या मदतीशिवाय माहिती भरणे शक्य होत नाही हे काम आहे दैनिक आहे शिवाय रोज त्रयस्थ व्यक्तीकडून माहिती भरणे शक्य नाही शिवाय पर्याय नसणे वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे माहिती भरण्याची पद्धत अतिशय किचकट असल्यामुळे या तुटीमुळे अंगणवाडी सेविका त्रस्त झाले आहेत त्याबाबत शासनाने अत्यावश्यक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
कमलताई परुळेकर झाल्या आक्रमक
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मोहन भोई व मुख्य सेविका यांच्याशी कमलताई परुळेकर यांनी चर्चा करीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढील आदेश होईपर्यंत अंगणवाडी उघडू नका तसे आदेश दिले असताना प्रकल्प अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून अंगणवाडी सुरू करण्यासाठी सूचना कशा दिल्या जातात असा सवाल परूळेकर यांनी केला सीईओपेक्षा कर्मचारी मोठे आहेत काय असे विचार उपस्थित कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले.

