कोकणशासकीय

शिरशिंगे ते शिवापूर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा..ग्रामस्थांची मागणी

.. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागा समोर लाक्षणिक उपोषण करू..

*कार्यकारी संपादक -आनंद धोंड*

*सावंतवाडी -* शिरशिंगे ते शिवापूर हा रस्ता सावंतवाडी आणि कुडाळ या दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता असून ह्या रस्त्याचे काम शासन स्थरावरून मंजूर आहे.परंतु सन २०१८ मध्ये वनविभागाने मंजूर रस्त्याचे काम करण्यास प्रतिबंध घातल्याने या रस्त्याचे काम अर्धवट आहे.
या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदर रस्त्यावर दरडी पडून रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला असून शिरशिंगे ते शिवापूर या रस्त्यावरून अनेक वर्षे चालू असलेली वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.
वारंवार अर्ज,निवेदन आणि उपोषण करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने आश्वासना पलीकडे काहीच केले नाही.१५ ऑगस्ट २०२० च्या उपोषण प्रसंगी बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे काम जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करा अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करू अश्या प्रकारचे निवेदन शिरशिंगे आणि शिवापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिले आहे.
यावेळी कुडाळ माजी प.समिती सदस्य मोहन सावंत,शिवसेना वि.संघटक सुरेश शिर्के,जीवन लाड,बाळकृष्ण पेडणेकर, संतोष चव्हाण,बाबू सुर्वे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!