आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

गुरुनाथ गुरव यांना २०२०-२१ सालचा आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार प्रधान

🛑प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड

🎴सावंतवाडी : दि.०३ : दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून ज्या अधिकाऱ्यांनी या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली त्या अधिकारी कर्मचारी वर्गाला सन्मानित करण्यासाठी पुरस्कार दिले जातात. गत वर्षी प्रमाणे २०२०-२१ या वर्षी सुद्धा सावंतवाडी तालुक्यातील आकेरी गावचे सुपुत्र आणि आंबोली मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गुरुनाथ गुरव यांना या वर्षीचा आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार काझी शहाबुद्दीन हॉल सावंतवाडी येथे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्ले तहसीलदार लोकरे, दोडामार्ग तहसीलदार खानोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

२०१९-२० यावर्षी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी तर २०२०-२१ यावर्षी प्रांताधिकारी खांडेकर यांच्या हस्ते असे सलग दोन वेळा आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने गुरव यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांकडून गुरुनाथ गुरव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!