सावंतवाडी

संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातुनच व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा-जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर

संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातुनच व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा,या महामार्गाचे आम्ही स्वागतच करू… जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर

हा महामार्ग म्हणजे सावंतवाडी शहराबरोबरच तालुक्यासाठी शेवटची सुवर्णसंधी,काही ठिकाणी नुकसान होईल परंतु भावी पिढीसाठी हा महामार्ग रोजगार देणारा ठरेल

केंद्रीय मंत्री मा.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून निर्माण होणारा संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी मार्गेच व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे,हा महामार्ग इन्सुलीतुन गेल्यास आम्ही त्याचे स्वागतच करू असे असे जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर यांनी सांगितले आहे. हा महामार्ग म्हणजे सावंतवाडी शहराबरोबरच तालुक्यासाठी शेवटची सुवर्णसंधी असुन ही संधी आता आपण गमावु देता कामा नये,या‌साठी शहरातील सर्वपक्षीयांनी एकत्र येत या महामार्गासाठी रिंग रोड ची जागा लवकरात लवकर कशी संपादित करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,कारण हा महामार्ग म्हणजे शहराची आणि शहराला लागून असलेल्या गावांची भरभराट करणारा मार्ग ठरणार आहे.एक महामार्ग शहराच्या आधीच बाहेरुन गेला त्यामुळे सावंतवाडी शहराला आधीच नुकसान सोसावे लागत आहे.हा‌ महामार्ग सावंतवाडी शहरातुन गेल्यास शहरातील उद्योगधंदे-व्यापार वाढण्यास मदत होईल,त्याचबरोबर सावंतवाडी ते माजगाव-इन्सुली बांदा अशी मोठी बाजारपेठ तयार होणार आहे.काही ठिकाणी नुकसान होणार आहे परंतु येणाऱ्या भावी पिढीसाठी हा महामार्ग रोजगार देणारा ठरेल.अशी माहिती गुरुनाथ पेडणेकर यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!