आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

न्यायालयाने बंदी घातलेल्या क्षेत्रात दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात अवैध वृक्षतोड………वनविभागाचे दुर्लक्ष……_*

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग

_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्यूरोन्यूज:-

🎴दोडामार्ग,दि,३०जुलै:-मुंबई उच्च न्यायालयाने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील वृक्षतोड बंदी घातलेल्या भागात वृक्षतोड करूनही सौम्य कारवाई करत वनाधिकारी यांनी न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे असे
सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सांगितले. त्यांनी माहिती अधिकारात वृक्षतोड प्रकरण उघडकीस आणले आहे.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील वृक्षतोड बंदी असलेल्या क्षेत्रातील सुमारे १६ हजार झाडांची कत्तल झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण १२६ विनापरवाना वृक्षतोडीची प्रकरणे या क्षेत्रात घडलेली आहेत. यातील सावंतवाडी तालुक्यात ६ हजार तर दोडामार्ग तालुक्यात सुमारे १० हजार झाडांवर विनापरवाना कुऱ्हाड चालविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे वन अधिकाऱ्यांनी सदर विनापरवाना तोडीचा माल जप्त करून तो सरकार जमा करणे बंधनकारक असताना केलेली प्रचंड वृक्षतोड जाग्यावरच जाळून टाकल्याचा जबाब दिला आहे. त्यामुळे याप्रकरणी अर्थपूर्ण तडजोड झाल्याचा संशय असून या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केली आहे.

याबाबत सावंतवाडी वनविभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण १२६ विनापरवाना वृक्षतोडीची प्रकरणे घडलेली आहेत. त्यापैकी केवळ ७४ प्रकरणे पुरविण्यात आलेली असून त्यातील २९ विनापरवाना वृक्षतोडीची प्रकरणे मुंबई हायकोर्टाने सावंतवाडी तालुक्यामधील वृक्षतोडीस बंदी घातलेल्या २५ गावांमध्ये झाली आहेत. यामध्ये सुमारे २ हजार ७५९ झाडांची कत्तल झाली आहे तर उर्वरित ४५ विनापरवाना प्रकरणात सुमारे तीन हजार पाचशे झाडांची कत्तल झाली आहे अशी एकूण ७४ विनापरवाना वृक्षतोड मध्ये ६ हजार २५९ झाडांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सावंतवाडी आणि दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांच्यासह वनपाल व वन कर्मचारी या सर्व प्रकाराला जबाबदार आहेत तसेच आता वनक्षेत्रपाल बदलीच्या हालचाली करत असून झोन बदलून घेतला आहे मात्र त्यांना साऱ्या प्रकाराची चौकशी झाल्याशिवाय सोडले जाऊ नये अशी मागणी जयंत बरेगार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऑनलाईन पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

 

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!