अखेर सात दिवसानंतर गाळेल येथे “त्या” युवकाचा मृतदेह हाती लागला
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ ब्यूरोन्यूज :
🌄बांदा, दि-३०जुलै :-गेले सात दिवस गाळेल येथील डोंगर खचलेल्या मातीखाली गाडला गेलेला वेंगुर्ल्यातील तो युवक अखेर सापडला असून प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले आहे, ही माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गीतेश गावडे रा.मठ, (२८) असे त्याचे नाव आहे. संबंधित युवक गोवा येथे कामाला जात असताना अचानक दरड कोसळल्याने तो खाली अडकला होता. दरम्यान दर कोसळलेला भाग मोठा असल्यामुळे त्याठिकाणी गेले सहा दिवस सुरू असलेल्या शोधमोहिमेला अपयश येत होते. एनडीआरएफ टीम स्थानिक ग्रामस्थ व महसूल प्रशासन यांच्या माध्यमातून ही शोधमोहीम सुरू होती. दरम्यान दोन दिवसानंतर मदत कार्य थांबविण्याचा निर्णय प्रशासन घेत असतानाच जोपर्यंत संबंधित युवकाचा मृतदेह हाती लागत नाही तोपर्यंत मोहीम थांबवू नका अशा सूचना आमदार दीपक केसरकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज तब्बल सातव्या दिवशी या शोध मोहिमेला यश आले आहे. त्या युवकाचा मृतदेह दुचाकीसह आढळून आला. मात्र ज्या ठिकाणी तो अडकल्याची शक्यता होती. त्या ठिकाणी “तो” आढळून आला नाही, असे श्री. म्हात्रे यांनी सांगितले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

