निगुडे पाटिलवाडीला पुराचा विळखा
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :अजय भाईप
🎴बांदा, दि-२४जूलै :-निगुडे पाटीलवाडी या ठिकाणी पुराच्या पाण्याने रौद्ररूप धारण केल्यामुळे निगुडे पाटीलवाडी तील अनेक घरांना फटका निगुडे पाटीलवाडी या ठिकाणी पहाटे सकाळी चार वाजता हळू पुराचे पाणी घरामध्ये शिरायला सुरुवात झाले म्हणता म्हणता सकाळी सहाच्या सुमारास अनेक घरांमध्ये पाणी घुसले पहाटेची वेळ असल्यामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली हा हा म्हणता संपूर्ण घरांमध्ये पाणी घुसले यामध्ये निगुडे पाटील वाडीतील माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, जूजे फर्नांडिस, अरुण शेगडे, बेजनी गुडीनो, दशरथ पाटील, श्याम पाटील, नंदकिशोर पाटील, दयानंद पाटील, आगोस्तीन गुड्डीनो, लक्ष्मी पाटील तसेच संजय पाटील यांच्या घराची मातीची भिंत कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच मार्शल गुड्डीनो, बाबू गुड्डीनो यांचे काही प्रमाणात नुकसान झाले अनेक गाड्याही पाण्यामध्ये अडकून पडल्या चार चाकी गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले तसेच पिण्याच्या विहिरीमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले इलेक्ट्रॉनिक्स टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, तांदूळ कडधान्य तसेच सोपा, बेड घरातील सर्व वस्तूंची पुरामुळे विल्हेवाट लागली काही जणांच्या घरात शिल्लकच काही नाही राहिले पुराचे पाणी गाळ सर्व घरांमध्ये घुसले निगुडे सरपंच श्री समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे
यांनी पूरस्थितीची पाहणी केली उद्या निगुडे तलाठी श्रीमती भाग्यलक्ष्मी शिंदे व मंडळाधिकारी श्री पवार यांच्या उपस्थितीत पंचनामे करणार असे सरपंच श्री समीर गावडे यांनी सांगितले सर्वजण सुखरूप आहेत सकाळपासून मोबाईल फोन नेटवर्क नसल्यामुळे अनेक जणांशी संपर्क होत नव्हता निगुडे तलाठी श्रीमती भाग्यलक्ष्मी शिंदे यांनी पूरस्थितीची पाहणी केली परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे वस्तीमध्ये जाता आले नाही सायंकाळी हळूहळू पाण्याचा प्रवाह पाच वाजेपर्यंत कमी झाला रस्त्यावर पाणी साचल्यामुळे सिराज हेरेकर यांच्या घरापर्यंत जाणे शक्य झाले नाही त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांशी भेट घेतली असता पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा पूर पाटीलवाडी मध्ये आला अनेक दुचाकी घरांमध्येही अडकून राहिलेल्या गुरांना बाहेर काढण्यासाठी सकाळी आलेला टेम्पो राहिला उद्या सकाळी पंचनामे करण्यात येणार आहे असे श्री समीर गावडे यांनी सांगितले तरी या वाडीतील नागरिकांनी सतर्क राहावे निगुडे गावातून बांदा मार्ग जाणारी वाहतूक सकाळपासून बंद होती सायंकाळी सात वाजेपर्यंत पाण्याचा प्रवाह चालू होता कुठचीही जीवित हानी झाली नाही शासनाने अलर्ट केल्यामुळे दिनांक 25 जुलै पर्यंत नागरिकांनी घरीच थांबावे उगाच बाहेर पडू नये असे आवाहनही सरपंच श्री समीर गावडे यांनी केले आहे
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

