तब्बल सात तासांनंतरआंबोली घाट मार्ग सुरु मात्र अवजड वाहतूक बंद
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴आंबोली, दि- २३जुलै:-आंबोली घाटात कोसळलेले दरडीचे दगड-माती बाजूला करण्यास सावंतवाडी बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासनाला तब्बल सात तासानंतर यश आले आहे, त्यानंतर उशिरा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू अवजड वाहतूकीसाठी हा मार्ग बंद करण्यात येणार आहे, असे पोलिस निरिक्षक सचिन हुंदळेकर यांनी सांगितले.
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात घाटात दोन ते तीन ठिकाणी दरडीचा काही भाग आणि माती रस्त्यावर कोसळली होती. त्यामुळे सावंतवाडी कोल्हापूर हा राज्यमार्ग वाहतूकीसाठी बंद झाला होता. त्यामुळे अनेक जणांना त्याचा फटका सहन करावा लागला होता. त्याच दरम्यान माडखोल-धवडकी येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे घाटात जेसीबी तसेच अन्य साहित्य नेण्यास अडचणी येत होत्या.परंतू अखेर सर्व अडचणींवर मात करीत बांधकाम विभाग आणि पोलिस खात्याने त्याठिकणी पडलेली माती दूर केली आहे. मात्र तात्पुरता धोका दुर झाला असला तरी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कोसळणाऱ्या दरडीचा धोका वाढला आहे.त्यामुळे त्या ठिकाणवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व वाहन चालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ज्ञदरम्यान दुपारनंतर वाहतूक जेसीबीने पूर्ववत करण्यात आली. यावेळी आंबोलीत त्याठिकाणी पोलीस निरीक्षक सचिन हुंदलेकर, सहाय्यक निरीक्षक बाबर यांनी वाहतूक पूर्ववत केली. आंबोली गावातही पुरामुळे मोठी नुकसानी झाली. यात मुळवंदवाडी येथील घरामध्ये नदीची पाणी पातळी वाढून पाणी घुसले. त्यात घरातील सामान, इलेक्ट्रॉनिक वस्तू धान्य आदींचे नुकसान झाले. यामध्ये सदाशिव पारधी, गणेश पडते, रुक्मिणी कृष्णा पारधी, रुक्मिणी विठ्ठल पारधी, लक्ष्मण कृष्णा पारधी, सुरेश पारधी, प्रकाश पारधी, संतोष पारधी, सविता पारधी यांचे नुकसान झाले. हरिजन येथील ‘जाधव आणि पार्वती महादेव जाधव यांच्या घराची पडझड होवून नुकसान झाले. यानंतर आंबोली सरपंच गजानन पालेकर, ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहिराम, महेश पावसकर, आबा नार्वेकर, तलाठी श्री. डवरे, लाडू गावडे यांनी पाहणी करून पंचनामा केला. आंबोलीत ४३५ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस लागून नुकसान झाले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

