राजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व पक्ष आमदार एकत्र आले परंतु ते पराभव करू शकले नाही; नगराध्यक्ष संजु परब

▪️येत्या निवडणुकीत सुद्धा सर्व पक्ष एकत्र आले तरी भाजपाचा पराभव करू शकणार नाहीत; नगराध्यक्षांनी व्यक्त केला विश्र्वास

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१२: माझ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व पक्ष आमदार एकत्र आले परंतु ते पराभव करू शकले नाही. आता येत्या निवडणुकीत सुद्धा सर्व पक्ष एकत्र आले तरी भाजपाचा पराभव करू शकणार नाहीत, असा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा भाजपाच्यावतीने बॅरिस्टर नाथ पै सभागृहात मध्ये सत्कार करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष संजू परब बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नुतन शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक दादा मालवणकर, महिला शहराध्यक्ष सरोज कुडतरकर, धनश्री गावकर, नगरसेवक आनंद नेवगी, दिपाली भालेकर, शामी केनवडेकर,केतन आजगावकर, दिना नाईक, अँड.अनिल निरवडेकर, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, बेला पिंटो, मोहिनी मडगावकर, धीरेंद्र म्हापसेकर, अमित परब आदी मान्यवर उपस्थित होते.

सावंतवाडी शहरातील सर्व प्रभागांमधील भाजपाच्या बुथ प्रमुखांनी भाजपाच्यावतीने श्री गोंदावळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम नगराध्यक्ष संजू परब यांनी सत्कार केला.

यावेळी नगराध्यक्ष परब म्हणाले, माझा मित्र अजय गोंदावळे भाजपा शहर अध्यक्ष झाला याचा मला आनंद आहे. मागील २८ वर्षे आम्ही एकत्र आहोत आणि आमची अतुट मैत्री आहे प्रत्येक निवडणुकात अजय माझ्याबरोबर असतो मागील चार वर्षांपूर्वी आम्ही काँग्रेस पक्षात होतो त्यावेळी आठ नगरसेवक विजयी झाले होते त्यावेळी देखील अजय माझ्या सोबत होता त्याने एकदा पक्षबांधणीची भूमिका ठरविल्यानंतर तो मागे हटत नाही तो यशस्वी होतो असा मला अनुभव आहे असे संजू परब म्हणाले.

सावंतवाडी भाजपा शहर अध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते तेही या पदासाठी योग्य होते परंतु पक्ष संघटना बांधणीसाठी पक्ष नेतृत्वाने अजय गोंदावळे यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचे ठरविल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी पडली आहे आता आपण सर्वांनी मिळून हातात हात घालून भाजपा पक्ष संघटना आणि सावंतवाडी शहराचा विकास यासाठी कटिबद्ध होऊया असे नगराध्यक्ष संजू परब यांनी आवाहन केले.

सावंतवाडी नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे आणि यापुढे सर्व नगरसेवक भाजपाचे विजयी होतील असा दावा नगराध्यक्ष संजू परब यांनी केला ते म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते दादा मालवणकर यांनी अजय गोंदावळे यांला आशीर्वाद देताना शहरात पक्ष संघटना वाढविण्याचे आव्हान केले आहे, आता निश्चित अजय भाजपा संघटना वाढविण्यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.

माझ्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आमदार दिपक केसरकर असे सर्व एकत्र आले परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला, आता पुढील नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा सर्व पक्ष एकत्र आले तरी त्यांना त्यांचा पराभव पुन्हा स्विकारावा लागेल असा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त करून सावंतवाडी नगरपरिषदेवर पुढील निवडणुकीत आमचाच विजय होईल असे ते म्हणाले.

यावेळी भाजपाचे नुतन शहराध्यक्ष अजय गोंदावळे म्हणाले, माझ्या आयुष्यात भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचे शहराध्यक्ष पद प्रथमच मिळाले आहे आणि माझा असा सत्कारही शहराने मोठ्या थाटात केला आहे त्यामुळे पुढील काळात शहरातील भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी लक्ष देणार आहे शहराचा विकास आणि नगराध्यक्ष संजू परब यांना साथ देण्यासाठी आपण पुढील काळात सतत प्रयत्न करत राहीन.

तसेच लवकरच भाजपा शहराची कार्यकरणी देखील जाहीर करणार आहे असे ते म्हणाले. यापूर्वी च्या निवडणुकीत आठ नगरसेवक विजयी झाले होते आता पुढील निवडणुकीत भाजपाचे सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष ही भाजपचा असेल असा विश्वास अजय गोंदावळे यांनी व्यक्त करून भाजपाचे नेते आणि नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना जिल्हाअध्यक्ष राजन तेली यांचे सहकार्य सतत राहत आले आहे त्यामुळे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पुढील काळात शहराची संघटना बळकट करताना शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांना साथ देऊन शहराचा विकास घडवू या असे आवाहन अजय गोंदावळे यांनी केले .आपणा सर्वांची या कामासाठी साथ मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नगरपालिका गटनेते राजू बेग, दादा मालवणकर, दिपाली भालेकर, धीरेंद्र म्हापसेकर, रवी नाईक, आनंद नेवगी आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत अजय गोंदावळे यांना शुभेच्छा दिल्या, तर आभार विनोद सावंत यांनी मानले.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!