संजू परब यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचा साक्षिदार मी*संजय पडते

*🛑नारायण राणे यांच्यावर खोटी निष्ठा दाखवत शिवसेनेत येण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या घरी दैवत गणपती समोर चर्चा केली आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या लक्ष्मीचा वास येताच भाजपात गेले असे संजू परब-संजय पडते*

*🛑संजू परब यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचा साक्षिदार मी*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी,दि.२२ :*
नारायण राणे यांच्यावर खोटी निष्ठा दाखवत शिवसेनेत येण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या घरी दैवत गणपती समोर चर्चा केली आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या लक्ष्मीचा वास येताच भाजपात गेले. शिवसेनेत प्रवेश चर्चा केली तेव्हाचा मी साक्षीदार आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सांगितले.
आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयांमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संजय पडते बोलत होते यावेळी शिवसेना नगरपरिषद गटनेत्या आनारोजीन लोबो, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, योगेश नाईक आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार घेतला ते म्हणाले, ते लोकप्रिय आमदार असल्याने जनतेने तीन वेळा निवडून दिले आहे. आमदार केसरकर यांच्यावर टीका म्हणजे सुर्यावर थुकंण्यासारखे आहे. शिवसेना प्रवेश चर्चा खासदार विनायक राऊत यांच्या घरी दैवत गणपती बाप्पा समोर झाली तसेच आमदार केसरकर यांनी पैसे मागितले हे सांगितले तेही सत्य आहे.
शिवसेना प्रवेश चर्चा प्रसंगी शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि चांगले काम केले तर आमदारकीची उमेदवारी देण्यात येणार आहे असे नगराध्यक्ष संजू परब यांना सांगितले होते मात्र त्यांची पैशांची मागणी पूर्ण करता येणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर श्री. परब यांना आमदार रवींद्र चव्हाण यांच्या लक्ष्मीचा वास आला आणि ते भाजपात जाण्याची तयारी करू लागले. नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आपल्या सोबत असतील असे म्हटले होते. या दरम्यान नारायण राणे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला तो परब यांच्या पथ्यावर पडला, असे संजय पडते यांनी सांगितले.
नारायण राणे यांच्या वर निष्ठा आहे असे भासवत शिवसेना आणि भाजपा सोबत श्री. परब यांनी चर्चा केली होती, हे सत्य आहे असे संजय पडते म्हणाले.
पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून सावंतवाडी शहरातील विकासकामे केली आमदार दीपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करून दिला. या कामाकडे नगराध्यक्ष, नगरपालीका यांनी लक्ष दिले पाहिजे. या कामाबद्दल तक्रारी असतील तर पर्यटन महामंडळाकडे तक्रारी करण्याची गरज आहे मात्र आमदार केसरकर यांच्यावर नाहक टीका केली जात आहे, असे श्री. पडते यांनी सांगितले. पर्यटन महामंडळाच्या कामांबाबत तक्रारी असतील तर चौकशी व्हायला हवी आणि आमदार दीपक केसरकर हेही त्यांच मताचे आहेत असे श्री पडते यांनी सांगितले.
नगराध्यक्ष संजू परब यांनी स्टाॅल हटाव,भाजी विक्रेते हटाव अशा आठ महिन्यांत मोहीमा आखून लोकांना त्रास दिला आहे. यापूर्वी कोणत्याही नगराध्यक्षांनी त्रास दिलेला नाही.असे संजय पडते म्हणाले. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार व मंत्री काळात दिपकभाई शहरातील नागरिकांशी असे वागले नाहीत उलट सावंतवाडी शहराचे आधुनिक शिल्पकार आमदार दीपक केसरकर ठरले आहेत असे ते म्हणाले.
नगरपालिका बैठकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी पर्यटन विकास महामंडळाच्या प्रकल्पावर आवाज उठवला होता,असे आनारोजीन लोबो यांनी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

 

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!