आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 अर्जुन रावराणे विद्यालयाचा निकाल १०० %..

🛑 कु.सृष्टी हांडे या विद्यार्थीनी एस.एस.सी परिक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवत प्रशालेत प्रथम..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-१८ :- दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेतील कु.सृष्टी लक्ष्मण हांडे. या विद्यार्थीनीने एस.एस.सी परिक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवत प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच कु.पार्थ सचिन क्षीरसागर या विद्यार्थ्याने ४९७ गुण मिळवत ९९.४०% गुण मिळवत प्रशालेत द्वितीय क्रमांक पटकावला तर कु. मैथिली संभाजी रावराणे हिने ४८२ गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. एस एस सी परिक्षेत प्रशालेचे एकुण ५७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत,१८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत,१७ विद्यार्थी तृतीय श्रेणीत तर २ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांचे प्रशालेचे स्थानिक अध्यक्ष तथा संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे यांनी विशेष अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नादकर बी.एस, जेष्ठ शिक्षक शिंदे एस.बी, वर्ग शिक्षक चोरगे एम.एस. तसेच विषय शिक्षक पवार पी.बी., पाटील एस.एस., केळकर ए.जी., सावंत पी.पी.,भोसले एस.व्ही., बोडेकर जे.एस., परिट ए.एस., तुळसणकर एस टी, सुर्यवंशी एस.एम. यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!