🛑 रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंटरने गाठली वृक्षारोपणाची सेंचुरी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१५ :- काही महिन्यांपूर्वीच नव्याने स्थापन झालेल्या रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रल ने आज मुंबई गोवा हायवे लगत वृक्षारोपण करत शंभरीचा टप्पा गाठला एक जुलै कृषी दिन व रोटरीच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला या अभिनयाचा प्रारंभ क्लबचे अध्यक्ष रोटरी डॉक्टर प्रशांत कोलते सचिव रोटरी उदयकुमार जांभवडेकर खजिनदार रोटरी नवीन बांदेकर यांनी केले कसाल हायस्कूल, कोलते हॉस्पिटल, संतोष कदम यांचे फार्म हाऊसवर , रोटरी शंकरराव कोकितकर यांच्या घरी डॉक्टर प्रशांत कोलते यांच्या करूळ येथील घरी या ठिकाणी वृक्षारोपण करत सर्व रोटरी त्यांच्या सहकार्याने मुंबई-गोवा हायवे लगत १०० वेळ रोप ज्येष्ठ रोटरी शंकरराव कोकितकर व १०१ वे रोप नवीन बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले या अभियानात आंबा ,पोफळी, काजू, जांभूळ ,औदुंबर अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. हायवेलगत संरक्षण जाळी लावण्यात आली .कसाल ओरोस दरम्यान आणखीही फळ झाडे लावण्याचा मानस रोटरी अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कोलते यांनी व्यक्त केला. झाडे लावण्यासोबतच यांचा संगोपनही करणार असल्याचं यावेळी डॉ प्रशांत कोलते त्यांनी सांगितले हे अभियान कृषीतज्ञ रोटरी डॉक्टर विलास सावंत यांच्या मार्गदर्शनाने सुरू राहणार असल्याचे यावेळी डॉक्टर प्रशांत कोलते यांनी सांगितले रोटरी शंकरराव कोकितकर रोटरी उदय जांभवडेकर रोटरी नवीन बांदेकर रोटरी विलास सावंत रोटरी रो व्हिक्टर फर्नांडिस ,रो अरूण मालणकर, रो रविकिरण डांगी, रो अभिजित जैतापकर ,रो सिद्धांत सावंत ,रो आनंद मसुरकर उपस्थित होते .

