पुणे – महापालिका हद्दीत पुढील आदेशापर्यंत सध्याचेच नियम कायम लागू राहतील असा आदेश आयुक्त विक्रमकुमार यांनी काढला आहे.
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : सुर्यकांत जाधव
🎴पुणे : दि . १५ : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला असून राज्यातील रुग्णसंख्याही अद्याप तितकीशी कमी झालेली नाही. त्यामुळेच निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येणार नसून आहेत ते निर्बंध कायम राहणार आहेत, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता पुण्यातील निर्बंधांबद्दलही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- महापालिका हद्दीत पुढील आदेशापर्यंत सध्याचेच नियम कायम लागू राहतील असा आदेश आयुक्त विक्रमकुमार यांनी काढला आहे. कोरोनाचा संभाव्य धोका अद्याप कमी झाला नसल्यामुळे पुणे शहरात लागू असलेले निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आयुक्तांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे याआधी जे निर्बंध लागू करण्यात आले होते तेच निर्बंध पुढील सूचना येईपर्यंत लागू राहणार आहेत.

