कुडाळशैक्षणिकसिंधुदुर्ग

बॅ. नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयामध्ये मेणबत्ती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न..  

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१२: विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच एखादे कौशल्य असावे जेणेकरून त्याला स्वयं रोजगार मिळू शकतो ही गरज लक्षात घेऊन कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयांमध्ये केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व स्किल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया अंतर्गत युवा परिवर्तन या संस्थेच्या मदतीने उद्योजकता विकास कक्ष, महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या पुढाकाराने चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य अरुण मर्गज यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांची मेणबत्ती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या कार्यशाळेचे दीप प्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत युवा परिवर्तन चे प्रा. दत्तात्रय परुळेकर, श्री. दिपक कुडाळकर, प्रा. अरुण मर्गज प्रशिक्षक सौ. अक्षरा पांगम महिला महाविद्यालयाचे प्रा. परेश धावडे, सौ. कल्पना भंडारी, सौ. मधुरा इंसुलकर, एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. तृप्ती नाईक इत्यादी मंडळी उपस्थित होती.

सदर शिबीरामध्ये एकूण 30 विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेत उत्तमोत्तम कलात्मक मेणबत्या तयार करणे इ.गोष्टी शिकून घेतल्या. पुढील काही दिवसांमध्ये व्यावसायिक तत्त्वावर महाविद्यालयामध्येच सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून मेणबत्तीचे उत्पादन घेऊन त्यांची विक्री व्यवस्था सुद्धा राबविली जाणार आहे. बाहेरील किरकोळ मार्केट पेक्षा कमी दराने व घाऊक स्वरूपातही सदर ठिकाणी मेणबत्त्या उपलब्ध असणार आहेत.

संस्थेचे सल्लागार प्रा. चेतन प्रभू, चेअरमन उमेश गाळवणकर यांच्यासहित याकामी युवा परिवर्तन चे प्रा. दत्तात्रय परुळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक दीपक  कुडाळकर व प्रशिक्षक सौ. अक्षरा पांगम उभयतांचे मोलाचे सहकार्य लाभले.

_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!