कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

आमदार दीपक केसरकरच खरे छुपे दहशतवादी-राजन तेली* …

 

*🛑राजकारणातून संपविण्याची भाषा खपवून घेतली जाणार नाही*
*भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पलटवार*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*

*🎴 सावंतवाडी*
नगराध्यक्ष संजू परब एकटे नाहीत. संपूर्ण भाजपची ताकद त्यांचा मागे आहे. त्यामुळे आ. दीपक केसरकर यांनी कोणाला संपविण्याची भाषा करु नये, ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच आ. दीपक केसरकर यांचा हा छुपा दहशतवाद असून हीच का तुमची संस्कृती व प्रवृत्ती आहे का, असा पलटवार भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.
दरम्यान, संजू परब यांचा वाढदिनी केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांना पायघड्या घालायला कोण आलं होतं, असा सवालही त्यांनी केला. तर सत्ताधारी पक्षातील कोण कोण भाजपच्या संपर्कात आहेत याची भांडेफोड आम्ही करावी का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे निधन झाले. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचे राजकारण नाही. मात्र, आपल्या पक्षातील आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्या कुटुंबियांची साधी चौकशी करणे हे तुमचे कर्तव्य असते. असे असताना कोरोना च्या काळात तब्येतीचे कारण पुढे करून मुंबईत जाऊन लपून बसलेल्या आ. केसरकर यांनी साधी कोणाची चौकशीही केली नाही. आम्ही त्यांना भेटायला गेल्यावर ही खंत त्यांनी आमच्याकडे व्यक्त केली. कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहभागी होणं त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपलं काम असतं, तुमची ती संस्कृती नसेल. मात्र, आमचे तसे नाही, आम्ही कुटुंब म्हणून राहतो आणि सर्वांच्या वेळा प्रसंगाला पडतो. भाजपा सर्वच कार्यकर्त्यांच्या सुख दुखात नेहमी पाठीशी राहिली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष संजू परबच काय सरपंच व भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशीही संपूर्ण पक्ष असून कोणाला धमकी देण्याचा प्रयत्न या पुढे करू नका, असा इशाराही राजन तेली यांनी केसरकर यांना दिला.
ना. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचे अभिनंदन सोडा मात्र त्यांच्यावर टीका करण्याचेच काम सेनेच्या लोकप्रतिनिधींनीनी केले. राणे यांच्या कामाचा आवाका यांना मुळात ज्ञातच नाही. त्यामुळेच मुक्ताफळ उधळण्याचा काम हे करत आहेत. मळगाव येथील मेळाव्यात सेनेच्या सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांचे फोटो लावून तुम्ही निवडून आलात. आता गरज सरो वैद्य मरो या भूमिकेतून तुम्ही करीत असलेली टीका योग्य नसून हिम्मत असेल तर राजीनामे द्या व पुन्हा स्वबळावर निवडून येऊन दाखवा, असे आव्हनही त्यांनी सेनेला दिले.
केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री पदाच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामांचा धडाका लावला होता. त्यानंतर महसूल मंत्री व उद्योग मंत्री या नात्याने ही त्यांनी जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले होते. आताही केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या पदाचा फायदा हा जिल्ह्यालाच होणार आहे. उद्योग खात्याच्या माध्यमातून येथील बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्हालाही जर पद मिळून त्याचा उपयोग जिल्ह्याला होत असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र केवळ राजकारण म्हणून तुम्ही करत असलेली टीका यापुढे सहन केली जाणार नाही. तुम्हाला टक्कर द्यायला राणे साहेबांची गरज नाही त्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्तेच पुरेसे आहेत.
भविष्यातील लोकसभा व विधानसभेचे या जिल्ह्यातील तिन्ही आमदार हे भाजपचेच असतील असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!