आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

साटेली – सातार्डा येथील बी.एस.एन.एल सुविधा वर्षभरापासुन खंडित, सध्या पुर्णपणेच ठप्प…

🛑 भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी बी.एस.एन.एल.ला धडक देत जिल्हा प्रबंधक बी.एस.एन.एल देशमुख यांना दिले निवेदन

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी : दि.१२ साटेली-सातार्डा येथील बी.एस.एन.एल सुविधा वर्षभरापासुन खंडित आणि सध्या पुर्णपणेच ठप्प असल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी बी.एस.एन.एल.ला धडक देत जिल्हा प्रबंधक बी.एस.एन.एल देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण, लसीकरण माहिती, रजिस्ट्रेशन, ऑफिसियल काम, शेतकरी वर्गास निदान काॅल करणे कींवा इतर कामांसाठी टाॅवर नेटवर्कची गरज आहे. सीमाभागात या सगळ्या विषयात गोवा टाॅवरवर अवलंबुन रहाणं योग्य नाही. त्यामुळे ही सेवा आठ ते दहा दिवसात पुर्ण करा, अन्यथा १५ ऑगस्टला टाॅवरवर चढुन उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी भाजप उपाध्यक्ष ज्ञानदिप राऊळ, भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, सातार्डा शक्तीप्रमुख रवि धुपकर, गोविंद प्रभु. कीरण प्रभु उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!