Tuesday, August 11, 2026
Latest:
कोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

सबनीसवाडा येथील रमेश ठाकूर यांचा संशयास्पद मृत्यू*

 

*🛑 अंगावरील दागिने चोरीस गेल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे,घातपाताचा संशय*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :*प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि- :-८*
येथील सबनिसवाडा भागात राहणाऱ्या निवृत्त एसटी वाहकाचा मृतदेह आज त्याच्या राहत्या घरात आढळून आला आहे. अंगावरील दागीने गायब असल्यामुळे त्यांच्या मृत्यू बाबत परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघड झाला. रमेश राघो ठाकुर (वय ६२), असे त्याचे नाव आहे. दरम्यान अंगावरचे दागिने पळवून नेण्यासाठी त्यांचा कोणी तरी घातपात केला असावा, असा संशय नागरीकांना आहे. मात्र अद्यापपर्यत ठोस माहीती देणारा कोणीही पुढे आलेले नाही. संबधित मृताची भाची बाहेरगावातून येत आहे. आपण येईपर्यत थांबा, अशी त्यांनी पोलिसांना विनवणी केल्याचे कळते. त्या आल्यानंतर अनेक गोष्टी पुढे येतील. तुर्तास आम्ही अन्य चौकशी करीत आहोत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान याबाबतची माहीती मिळताच पोलिस निरिक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक आनंद यशवंते, दर्शन सावंत, भूषण भोवर, शरद लोहकरे, महेश जाधव आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली असून, तपास सुरू आहे. दरम्यान श्री ठाकुर हे अविवाहीत होते. त्या ठिकाणी ते एकटेच राहत होते. त्यांचा मृतदेह आढळून आलेल्या भाड्याच्या खोलीत एक परप्रांतीय भाजी विक्रेता राहत होता. मात्र तो दोन महिन्यापुर्वी त्या ठिकाणावरुन सोडुन गेला होता. त्यामुळे त्यांच्या भाड्याच्या खोल्या रिकाम्या होत्या. ते कोणी तरी पाहण्याच्या उद्देशाने आला असेल, आणि हा प्रकार घडला असेल, असा तेथील नागरीकांचा संशय आहे. याबाबतची माहीती मिळताच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,राजू भालेकर, निशांत तोरसकर, विशाल सावंत आदी काऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!