अपरांत कोव्हिड हॉस्पिटल वृद्ध रुग्णांसाठी ठरतेय वरदान
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण : दि. ०७ अपरांत कोव्हिड हॉस्पिटल वयोवृद्ध नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. कोरोना प्रादुर्भावाने बाधित रुग्णांसाठी आवश्यक अद्ययावत सुखसोयींनी युक्त या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर्स व अनुभवी स्टाफ हे तत्पर व दक्ष सुविधांसाठी चोवीस तास उपलब्ध आहेत त्यामुळेच सर्व वयोगटातील रुग्णांना अल्ट्रामॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून उपचार देणारे कोकणातील एकमेव हॉस्पिटल म्हणून ओळखले जात आहे.
कोरोनाच्या या प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका वृद्ध नागरिकांना होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी अश्या रुग्णांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.त्यांच्या वयानुसार त्यांना आधीपासून असणाऱ्या ब्लडप्रेशर किंवा मधुमेह यासारख्या आजारांची तीव्रता व परिस्थिती यांचा संदर्भ घेऊन त्यास औषधोपचार केले जातात. नागरिकांना शारीरिक उपचार आणि सोबत मानसिक आधारही दिला जातो. प्रत्येक रुग्णाकडे वैयक्तिक लक्ष व नर्सिंग केअर सोबत फिजिओथेरपी देखील दिली जाते.
काही दिवसांपूर्वीच एक 70 वर्षांचे आजोबा त्यांचा HRCT..१५,Spo2..९५,ताप , श्र्वास घेण्यास होणारा त्रास ही सर्व लक्षणे घेऊन ते अपरांत कोव्हीड हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले. आजोबांचे वय आणि त्यांना असणारे पूर्वीचे आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सात दिवसांच्या अखंड प्रयत्नानंतर आजोबांना आज डिस्चार्ज देण्यात आले.अत्यल्प खर्चात उपचार मिळाल्याने रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टर्स आणि संपूर्ण हॉस्पिटल स्टाफ चे कौतुक करून आभार व्यक्त केले.सकारात्मक विचार आणि “अपरांत हॉस्पिटल” ने घेतलेल्या उत्तम काळजीमुळे या आजोबांनी जास्त वय असताना देखील कोरोनावर मात केली,आपण देखील घाबरून न जाता वेळीच उपचारांना सुरुवात करा आणि कोरोनावर मात करा असा संदेश अपरांत हॉस्पिटलने दिला आहे.

