🛑 फीचा तगादा लावणाऱ्या शैक्षणिक संस्था व खासगी शाळांविरोधात रस्त्यावर उतरू ; राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष प्रतिक नाईक
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०५ :- संपूर्ण जगावर कोरोनाच संकट आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. उद्योग-व्यवसाय सर्व ठप्प आहेत. अशावेळी काही खासगी शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांच्याकडून फी साठी तगादा लावला जातो आहे. फीचा तगादा लावणाऱ्या शैक्षणिक संस्था व खासगी शाळांविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून फी साठी पालकांकडे तगादा लावल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष प्रतिक नाईक यांनी दिला आहे.

