सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागात सुपरवायझर म्हणुन कार्यरत असलेले सुहास जोशी यांचे निधन
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : चौंडू पाटील
🎴आंबोली : दि. ०३ सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले सुहास जोशी (वय ५४), यांचे आज निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. गेली अनेक वर्ष ते बांधकाम विभागात कार्यरत होते.
आंबोली घाटाबाबत बरीचशी माहिती त्यांना होती. त्यामुळे बांधकाम अधिकारी त्यांच्या भरवशावर राहत असत.

