आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पथदीप लवकरात – लवकर सुरू करावेत, तेलकाटावासीयांमधुन होत आहे मागणी…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी : दि. ०३ मळगाव – तेलकाटावाडीतील पथदीप दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐन पावसाळ्यातच बंदावस्थेत असल्याने, येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होताच पथदीप बंद पडत असल्याने, तसेच त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हे पथदीप लवकरात लवकर सुरू करावेत, अशी मागणी तेलकाटावासीयांमधून होत आहे.

तेलकाटावाडीतील लोकांचा जाण्या – येण्याचा मार्ग हा अडगळीचा आहे. तसेच सध्या पाऊस सुरू असल्याने येथून ये – जा करताना या लोकांचे अधिकच हाल होत आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा सुरू होताच येथील सर्व पथदीप बंद पडले आहेत. तेलकाटावासियांनी तक्रार नोंदवूनही पथदीप सुरू करण्यात येत नाहीत. मात्र दरवर्षी गणेश चतुर्थीच्या तोंडावर आठवडाभर अगोदर पथदीप सुरू करण्यात येतात. त्याप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थी सणाची वाट बघितली जात आहे का, असा सवालही तेलकाटावासीयांमधून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने बंद पडलेले हे सर्व पथदीप लवकरात लवकर करावे, अशी मागणी तेलकाटावासीयांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!