कोकणदोडामार्गसिंधुदुर्ग

पाळयेत कत्तल झालेल्या झाडांची वन विभागाने घेतली दखल..

_*🛑 पाळयेत कत्तल झालेल्या झाडांची वन विभागाने घेतली दखल..*_

_*🛑 शिवसेना नेते संदेश पारकर यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यां सोबत केली कत्तल झालेल्या भागाची पाहणी..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२६ :-* तालुक्यात इको सेंन्सिटिव्ह झोन जाहीर केले असताना दुसरी कडे बेसुमार वृक्षांची कत्तल सुरु आहे. अशाच प्रकारची वृक्ष तोड पाळयेत घडल्या नंतर वर्तमान पत्रातुन त्याला वाचा फोडल्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शिवसेना नेते संदेश पारकर हे आज दोडामार्ग येथिल पाळये भागात दाखल झाले.
या वेळी वन विभागाची अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला तसेच या प्रकरणाचे लवकरात लवकर अहवाल सादर करावेत व अश्या बेसुमार होणाऱ्या वृक्ष तोडीवर कडक कारवाई करावी अश्या सुचना यांनी वन विभागाची अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा उप संघटक गोपाळ गवस, शिवसेना पदाधिकारी रामचंद्र सावंत, संजय नाईक तसेच वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, वनपाल सिमा शिरवलकर, व वनखात्याचे कुडल आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!