…या भागात पन्नास मीटरच्या अंतरात कंटेनमेंट झोन देखील करण्यात येणार
🛑 कामत सृष्टी कॉम्प्लेक्समधील सुमारे १४० पेक्षा जास्त लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्याचे काम सुरू…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. २३ शहरात परबवाडी येथे कामात सृष्टीमध्ये सापडलेला “डेल्टा प्लस” चा कोविड रुग्ण हा सध्या सक्रिय रुग्ण नसून उपचाराअंती तो रुग्ण बरा देखील झाला आहे. मात्र नगरपंचायतीने त्या अनुषंगाने सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. कामत सृष्टी कॉम्प्लेक्स मधील सुमारे १४० पेक्षा जास्त लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून, या भागात कंटेनमेंट झोन देखील करण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोविड संदर्भातील नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. कणकवली शहरात “डेल्टा प्लस”चा जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर नलावडे, तहसीलदार आर जे पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, गटनेते संजय कामतेकर, डॉ. संतोष चौगुले, डॉ.सतीश टाक, आरोग्य सेविका सौ भाट, माजी नगरसेवक बंडू गांगण, नगर पंचायत कर्मचारी सतीश कांबळे, प्रवीण गायकवाड, ध्वजा उचले व आरोग्य विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांनी कामात सृष्टी कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी भेट दिली.
नगराध्यक्ष नलावडे, तहसीलदार पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ यांनी आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या स्वॅब कलेक्शनच्या कामाची माहिती घेतली. कामत सृष्टी कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी स्वॅब कलेक्शन साठी आज व उद्या गुरुवारी दोन दिवस आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असणार आहे.
या कॉम्प्लेक्समधील सर्व नवीन मधील लोकांचे स्वॅब तपासणी करण्यात येणार असून, या भागात पन्नास मीटरच्या अंतरात कंटेनमेंट झोन देखील करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष नलावडे यांनी दिली. तर तहसीलदार आर. जे. पवार यांनी याठिकाणी उपस्थित राहत आढावा देखील घेतला. डॉ. संजय पोळ यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
“डेल्टा प्लस” चा कोविड रुग्ण जरी सापडला असला तरी तो रुग्ण उपचारा अंती पूर्णपणे बरा झाला आहे. मात्र नागरिकांनी नियमित मास्क वापरणे, व कोविड संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन डॉक्टर पोळ यांनी केले आहे.