आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

विज महावितरण कंपनीचा सावळागोंधळ – माजी नगरसेवक सुरेश भोगटे.

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. २२ शहरातील ग्राहकांना तीन पटीने वाढीव विज बिले येथील वीज कार्यालयात सुरेश भोगटे यांची धडक वाढीव बिलाबाबत श्री भोगटे यांच्याकडे अनेक ग्राहकांच्या तक्रारी तक्रारीनंतर सुरेश भोगटे यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. घुरे साहेब यांना जाब विचारला.

त्यावेळी त्यांचे कर्मचारी श्री. चव्हाण यांनी तात्काळ बिल दुरुस्ती करून दिली, त्यावेळी धुरे साहेब यांच्याशी झालेल्य चर्चेमध्ये महावितरण कंपनीच्या विज बिलातील ठेकेदार तसेच बिल रीडिंग घेणारे कर्मचारी यांच्या वादामुळे गेले दोन महिन्यातील विद्युत बिल सरांन सरी बिल दिली गेलेले आहेत.

ज्या ग्राहकांना गेल्या दोन महिन्यातील वीज बिले सरासरी दिली गेली आहेत. त्यामध्ये ज्या वाढीव तसेच चुकीची असतील, त्या दुरुस्त्या करून देऊ. ज्या बिलातील वाढीव रक्कम असेल ती कमी केली जाईल, असे सांगण्यात आले.

त्यावेळी वीज ग्राहक अमित चितारी, एस. के. नाईक, ईतोरीन डिसोझा,मॉन्टी डिसोजा, यांच्यासह इतर ग्राहक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!