अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपीला जामीन मंजुर
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : चौंडु पाटील
🎴 आंबोली : दि. २२ अल्पवयीन मुलीवर फुस लावुन पळवुन नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या कोल्हापुर येथील एकाला आज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने पंचवीस हजाराचा सशर्त जामीन मंजुर केला.
राजाराम कृष्णा पाटील असे त्याचे नाव आहे. याकामी आरोपीच्या वतीने ऍड. वैभव चव्हाण यांनी काम पाहिले, याबाबतची तक्रार संबंधित मुलीच्या नातेवाइकांनी दिली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आले होते, तो न्यायालयीन कोठडीत होता.

