दोडामार्ग तालुक्यातील मणेरी गावचे सुपुत्र राजु झोरे यांना पी. एच. डी. प्रदान
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : शंकर जाधव
🎴दोडामार्ग : दि. २१ तालुक्यातील मणेरी गावचे सुपुत्र प्रा राजु झोरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे.
राजू झोरे यांनी तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील लोकजीवनावर झालेल्या परिणामांचा भौगोलिक, अभ्यास या विषयावर नांदेड विद्यापीठातील भूगोल विभाग प्रमुख, डॉ.बी. आर. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून पीएचडी प्रबंध सादर केला होता. त्यांची अंतिम मुलाखत 22 मे 2019 रोजी झाली होती. त्यानंतर विद्यापीठांने त्यांना पीएचडी प्रदान केली आहे. प्रा. झोरे यांनी मणेरी सारख्या ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कष्टाने शिक्षण घेऊन पीएचडी पर्यंत झेप घेतली हे कौतुकास्पद आहे.
झोरे यांनी लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयातून भूगोल विषयातून बीए पदवी प्राप्त केली. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून एम.ए. केले होते. त्यानंतर तेथेच राहून त्यांनी सेट – नेट जीआरएफ या परीक्षा पास केल्या होत्या. त्यांचे कष्ट आणि हुशारीची दखल घेऊन युजीसी दिल्ली यांनी त्यांना पीएचडी करण्यासाठी संशोधन शिष्यवृत्ती मंजूर केली होती. सध्या ते केळकर महाविद्यालय देवगड येथे कार्यरत आहेत. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ऍड. अमित जामसंडेकर, प्राचार्य सौ.डॉ.सुखदा जांभळे, डॉ.राहुल पवार, डॉ.विशाल वाघ, किशोर गाडे, प्रा.डॉ.प्रज्ञाकुमार गाथाडे, प्रा.राजगोळकर, उदय पास्ते यांनी अभिनंदन केले आहे.

