शिवसेना पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील विलगीकरण कक्षात असणाऱ्या रुग्णांना शिवसेनेतर्फे सॅनिटायजर, मास्क, एनर्जी पावडरचे केले वाटप
🛑 तळवडे येथील विलगीकरण कक्षाला केले वस्तुंचे वाटप
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी : दि. १९ शिवसेना पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील विलगीकरण कक्षात असणाऱ्या रुग्णांना शिवसेनेतर्फे सॅनिटायजर, मास्क, एनर्जी पावडरचे वाटप आज करण्यात आले .
हे वाटप शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सावंतवाडी उपशहर प्रमुख अजित सागेलकर, तळवडे ग्रामंपचायत उपसरपंच गजानन जाधव, तळवडे विभाग प्रमुख विनोद काजरेकर, उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे, तळवडे शाखा प्रमुक अनिल जाधव, युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत, शिवसैनिक संजय गवस, ग्रामपंचायत सदस्य गोवरेश मेस्त्री, महेश परब, आरोग्यसेवक एस. एस. केरकर, योगेश सावंत, तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिवसेना पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला, शिवसेना तालुका प्रमुक रुपेश राऊळ यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील गरमीने भागातील विलगीकरण कक्ष यांना ह्या कोरोना संक्रमण बाधित रुग्णांकरीता वस्तू वाटप केल्या, ह्या वस्तू त्या गावाचे सरपंच व आरोग्य कर्मचारी यांच्याकडे सुपूर्द केल्या.