रत्नागिरीराजकीयसामाजिक

नो मास्क.. नो पेट्रोल.. नो डिझेल..

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षचे पेट्रोल पंपचालकांना निवेदन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०९: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूण शहर, उपनगर व परिसरातील पेट्रोल पंप चालकांना नो मास्क.. नो पेट्रोल.. नो डिझेल सुचनेचे निवेदन दिले. कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभरात थैमान घातले असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे तो केवळ निष्काळजीपणा मूळेच.सध्यस्थीतीत हा आजार सामूहिक संसर्ग टप्प्यावर असून ह्या आजारापासून बचावासाठी मास्क ही प्रमुख उपाययोजना आहे. राज्य शासन व आरोग्य यंत्रणांनी सर्वांनाच मास्कची सक्ती केली आहे. मात्र, याबाबतीत कोणीही गांभीर्य घेतले नसल्याचे निदर्शनास आले असून कोरोनाचा संसर्ग होणारे प्रमुख ठिकाण असणाऱ्या पेट्रोल पंपात पेट्रोल, डिझेल भरण्यास येणारे दुचाकी, चारचाकी वाहनचालक मास्क सक्तीच्या नियमाची,आदेशाची सर्रास पायमल्ली करत असल्याचे निदर्शनास आल्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या पदाधिकऱ्यांनी चिपळूण शहर,उपनगर व शहरालगत असणाऱ्या तसेच सावर्डे,मिरजोळी येथील पेट्रोलपंप चालकांना मास्क न लावणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लागावी याकरिता नो मास्क.. नो पेट्रोल.. नो डिझेल हा सक्तीचा नियम लागु करावा अश्या आशयाचे विनंतीवजा निवेदन दिले तसेच पंपांच्या आवरातील मोक्याच्या ठिकाणी नो मास्क… नो पेट्रोल.. नो डिझेल असे फलक लावण्यांत आले.शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या अभिनव उपक्रमाचे सर्व पंपचालकांनी कौतुक करीत योग्य  सहकार्याचे आश्वासन दिले.यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, कक्ष तालुकाप्रमुख सूरज कदम,कक्ष कार्यालय प्रमुख अविनाश सावंत,कक्ष शहरप्रमुख उदय ओतारी,उपतालुका प्रमुख विजय जाधव,उपशहर प्रमुख उमेश गुरव,कक्ष विभाग प्रमुख अजित पवार, सौरभ फागे,सुशील मोरे, प्रशांत डोईफोडे, सागर वाघमारे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥

_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_

_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._

_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._

_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._

_💫पाणी 24 तास उपलब्ध.._

*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*

*🤷🏻‍♂️ आमचा पत्ता 🤷🏻‍♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!