आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

रामेश्वर प्लाझा इमारतीमध्ये भरले पाणी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी भेट देत केली पाहणी …

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १६ शहरातील रामेश्वर प्लाझा इमारतीच्या परिसरात पाणी साचले होते. त्याची पाहणी करण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडु हर्णे आले. तसेच महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अधिकारी सलीम शेख यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करत ‘त्या’ नाल्यातुन पाण्याचा विसर्ग होत नसल्याची माहिती देत, सदर ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माहिती दिली.

नगरपंचायतच्यावतीने हॉटेल गोकुलधाम येथे अडकलेल्या सेंन्ट्रीगच्या फळ्या हटवत ‘त्या’ ठिकाणची पाहणी करण्यात आली. याचबरोबर ज्या समस्या कणकवली शहरात आहेत, त्या संदर्भात महामार्ग प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांनी तातडीने कारवाई करत सदर प्रश्न निकाली लावण्याची मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सलीम शेख यांच्याकडे केली आहे.

यावेळी गटनेते संजय कामतेकर, अजय गांगण आणि नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!